अवघ्या २० हजारांच्या केबलअभावी संत ज्ञानेश्वर उद्यान तीन दिवसांपासून बंद

Foto
रमेश लिंबोरे

पैठण : संत ज्ञानेश्वर उद्यानातील रोहित्रेचे केबल जळाल्याने गेल्या तीन दिवसांपासून उद्यान बंद ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अवघ्या २० हजार रुपयांची केबल उपलब्ध करून दिल्यास सुरू होऊ शकणारे हे उद्यान तीन दिवस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बंद पडल्याची संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

संत ज्ञानेश्वर उद्यान बंद असल्याबद्दल गोदावरी पाटबंधारे विभागाने कोणत्याही ठिकाणी फलक लावले नाही त्यामुळे उद्यान पाहण्यासाठी येणाऱ्या हजारो पर्यटकांना बंद दरवाजातून परत जावे लागत असून त्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे तर दुसरीकडे शासनाच्या तिजोरीत जमा होणाऱ्या लाखो रुपयांच्या महसुलावर कार्यकारी अभियंता
पर्यटकांचा हिरमोड, कार्यकारी अभियंता यांच्या निष्काळजीपणामुळे लाखो रुपयांच्या महसुलावर पाणी
गणेश हासे यांच्या नाकर्तेपणामुळे पाणी फेरले जात आहे.

 याप्रकरणी सखोल चौकशी होऊन याप्रकरणी लापरवाही बाळगणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. उद्यान बंद असल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत असून पर्यटनस्थळाच्या व्यवस्थापनाबाबत प्रशासनाची उदासीनता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. 

केवळ २० हजार रुपयांची केबल प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अन्यथा किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचा हा प्रकार म्हणजे सार्वजनिक पैशांचा आणि पर्यटकांच्या वेळेचा अपव्ययच आहे याप्रकरणी कार्यकारी अभियंता गणेश हासे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल घेत नाहीत त्यामुळे उद्यान पर्यटकांसाठी कधी सुरू होईल याची अधिक माहिती मिळू शकली नाही. 

बदलण्यासाठी तीन दिवस लागत असतील, तर पर्यटनस्थळांच्या देखभालीची जबाबदारी नेमकी कोणाची? लाखो रुपयांचा महसूल देणारे उद्यान सुरू ठेवण्यासाठी एवढी छोटी दुरुस्ती वेळेत का केली जात नाही? संबंधित अधिकाऱ्यांना या समस्येचे गांभीर्य का जाणवत नाही? पर्यटकांची गैरसोय, शासनाचे आर्थिक नुकसान आणि पर्यटनस्थळाची बदनामी याची जबाबदारी नेमकी कोण घेणार? संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करून तातडीने केबल बदलावी आणि संत ज्ञानेश्वर उद्यान पर्यटकांसाठी खुले करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.